राजीनामा देणार नाही -तिवारी

January 16, 2011 1:15 PM0 commentsViews: 2

16 जानेवारी

आदर्श सोसायटी घोटाळ्यात आपल्यावर झालेले सर्व आरोप चुकीचे असल्याचा दावा माहिती आयुक्त रामानंद तिवारी यांनी केला. आदर्श घोटाळ्यात मीच मुख्य आरोपी आहे असं चित्र मीडियानं रंगवलं आहे माझ्याकडे आदर्शची फाईल आली होती, त्यावर मी स्वाक्षरीही केली असली तरी केवळ यामुळे मी आरोपी होत नाही असं म्हणून तिवारींनी आदर्श घोटाळ्याचा चेंडू पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे टोलवला. आदर्शची फाईल खालून वर आली होती माझ्या सहीनंतर ती फाईल मुख्यमंत्र्यांकडेही गेली होती. मुख्यमंत्र्यांचा सेल त्याची चौकशी करुन मग निर्णय घेत असतो. त्यामुळे केवळ माझ्या सहीनं ही फाईल मंजूर झाली असं म्हणण योग्य नाही अशी पुष्टीही तिवारींनी यावेळी दिली. तसेच आपण राजीनामा दिलेला नाही आणि राज्यपालांनीही आपला राजीनामा मागितलेला नाही असं रामानंद तिवारी यांनी सांगितलं. आज रामानंद तिवारी यांनी राज्यपाल के.शंकरनारायणन यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांंशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. माझी बाजू मी राज्यपालांक़डे मांडली आहे. कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे असंही तिवारी यांनी यावेळी म्हटलं.

close