दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनावर हल्ला

November 3, 2008 9:17 AM0 commentsViews: 7

3 नोव्हेंबर दिल्ली दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनावर 20 ते 25 तरुणांनी हल्ला केलाय. सदनातल्या स्वागत कक्षाची त्यांनी मोडतोड केली. राष्ट्रवादी सेनेचे जयभगवान गोयल यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर हल्ले सुरूच राहिल्यास त्याला अशाच पद्धतीनं उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.महाराष्ट्राचे प्रतीक असलेल्या महाराष्ट्र सदन या सरकारी इमारतीवर दिवसाढवळ्या 20 ते 25 तरुणांनी हल्ला केला. आधी शिवसेनेत असलेले आणि आता राष्ट्रवादी सेना हा अपक्ष स्थापन केलेल्या जय भगवान गोयल यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. एकूणच निवडणुकांचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून मराठीचा मुद्दा जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केला जातोय.मुंबईतून जर उत्तर भारतीयांना पिटाळून लावलं तर मराठी लोकांनाही दिल्लीत राहू देणार नाही अशा घोषणा हे हल्लेखोर देत होते. जर उत्तर भारतीयांवर हल्ले थांबले नाहीत, तर मराठी खासदारांच्या तोंडाला काळ फासू असा इशाराही त्यांनी दिला. कॉग्रेस, भाजपसह सगळ्याच राजकीय पक्षांनी कडक शब्दात या घटनेचा निषेध केला. या हल्ल्या प्रकरणी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल असं शिवसेना खा.संजय राऊत यांनी सांगितलं.दरम्यान महाराष्ट्र सदनवर झालेल्या हल्ल्याप्रकरणात पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलंय. महाराष्ट्र सदनलाही अधिकची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

close