महागाईला आघाडी जबाबदार – अडवाणी

January 16, 2011 4:08 PM0 commentsViews:

16 जानेवारी

वाढती महागाई आणि घोटाळ्यांविरूध्द एनडीएनं आज मुंबईत आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. लालकृष्ण अडवाणी, नितिन गडकरी, उध्दव ठाकरे यांच्यासह एनडीतल्या सर्व घटक पक्षांंच्या नेत्यांनी वेगवेगळे भ्रष्टाचार आणि महागाईच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरलं. युपीएनं लोकसभा निवडणुकीत दिलेलं विदेशी बँकांमधील काळे पैसे देशात परत आणण्याचं वचन पूर्ण होणार का असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सभेत विचारला. हे सगळे पैसे काँग्रेस आणि काँग्रसेच्या सरकारातील घटक पक्षांच्या नेत्यांचे आहेत. म्हणूनच सरकार मूग गिळून गप्प आहे असंही अडवाणी म्हणाले. तर उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनी आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरण, लवासा,कॉमनवेल्थ घोटाळा. टू जी स्पेक्ट्रम घोटाळा आदी मुद्द्यावरून आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

close