ममता बॅनर्जींना दरवाढ अमान्य !

January 16, 2011 4:53 PM0 commentsViews: 2

16 जानेवारी

वाढत्या महागाईत केंद्र सरकारनं शनिवारी पेट्रोलच्या दरवाढीचा भर घातल्यानं युपीएचा घटक पक्ष असलेल्या तृणमुल काँग्रेसनं युपीए आघाडीला घरचा आहेर दिला. महिन्याभरात दुसर्‍यांदा झालेली ही इंधन दरातील वाढ ममता बॅनर्जींना मान्य नाही. त्यामुळे काँग्रेसचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नाराज ममता बॅनर्जी उद्या याविरोधात मोर्चा काढणार आहेत. येत्या काही दिवसात पश्चिम बंगालची निवडणूक होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर वाढती महागाई तृणमुल काँग्रेसला डोकेदुखी ठरत आहे.

काल शनिवारी पेट्रोलच्या किंमतीत 2 रुपये 50 पैशांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारी पेट्रोल कंपन्यांनी घेतला होता. महिन्याभरातली ही दुसरी दरवाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यानं ही दरवाढ करण्यात आली आहेत. तर इंडियन ऑयलनं दरात 2 रुपये 50 पैशांची वाढ केली. हिंदुस्तान पेट्रोलियमनं 2 रुपये 54 पैसे तर भारत पेट्रोलिमनं 2 रुपये 53 पैशांची दरवाढ केलीय. या तिन्ही कंपन्यांनी गेल्याच महिन्यात पेट्रोलच्या दरात 2 रुपये 94 पैशांची वाढ केली होती.

close