वर्ल्डकपसाठी टीम जाहीर ; रोहितला स्थान नाही

January 17, 2011 12:01 PM0 commentsViews: 5

17 जानेवारी

2011 क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेसाठी आज भारताच्या टीमची घोषणा करण्यात आली. चेन्नईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र मुंबईकर रोहीत शर्माला या टीममध्ये संधी मिळालेली नाही. महेंद्र सिंग धोणीसह आठ बॅट्समन या टीममध्ये आहेत. पण रोहीतला त्यात जागा मिळाली नाही. गेल्या वर्षभरात रोहितनं बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी केलीच आहे. पण बॉलिंगमध्येही त्यानं आपला फॉर्म दाखवून दिला होता. दक्षिण आफ्रिकेविरुध्द सुरु असलेल्या वन डे सीरिजमध्येही रोहितनं ऑलराऊंड कामगिरी केली. असं असूनही रोहित शर्माला टीममधून डावलण्यात आलं. भारतीय निवड समितीच्या या निर्णयानं मुंबईकरांमध्ये नाराजी पसरली.

वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीममध्ये महेंद्रसिंग धोणी, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, युवराज सिंग, विराट कोहली, सुरेश रैना, युसुफ पठाण, झहीर खान, आशीष नेहरा मुनाफ पटेल, प्रवीण कुमार, हरभजन सिंग, आर अश्विन, पीयूष चावला या खेळाडूंची निवड करण्यात आली.

close