जैतापूरमध्ये 10 गावांचे सरपंच राजीनामा देणार

January 17, 2011 7:54 AM0 commentsViews: 8

17 जानेवारीजैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या निषेधार्थ या परिसरातल्या ग्रामस्थांचा विरोध कायम आहे. या परिसरातल्या 10 गावच्या ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. तसेच या गावांचे सरपंचही आपल्या पदाचे राजीनामे देण्यासाठी राजापूर पंचायत समितीकडे रवाना झाले आहे. यामुळे जैतापूर परिसरात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला. विशेष म्हणजे उद्या मुंबईत या प्रकल्पाच्या संबंधात मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. त्याआधीच हे राजीनामा नाट्य सुरू झाल्यानं या प्रकल्पाला असलेला ग्रामस्थांचा विरोध पुन्हा एकदा स्पष्ट झाला.

close