‘आदर्श’नं स्वत:च चालवावा हातोडा !

January 17, 2011 11:55 AM0 commentsViews: 1

17 जानेवारी

पर्यावरण नियमांचं उल्लंघन केलं म्हणून आदर्श सोसायटी तीन महिन्यात पाडण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने काल रविवारी दिले आहेत. आता ही आदर्श सोसायटी पाडायची कशी आणि कोणी याचा विचार सुरु झाला. महत्तवाचं म्हणजे राज्य सरकारने या प्रकरणात सावध भूमिका घेतलेली आहे. 'आदर्श' सोसायटीनेच स्वतःहून तीन महिन्याच्या आत इमारत पाडायची आहे आणि तसं न झाल्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालय ही इमारत पाडण्याचे थेट आदेश राज्य सरकारला देणार आहे. याचा अर्थ तीन महिन्यांचा कालावधी आदर्श सोसायटीला देण्यात आला. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून या कारवाईसंदर्भात स्पष्ट सूचना मिळाली नसल्यानं राज्य सरकारनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली. अशी माहिती सूत्रांनी दिली. जर आदर्श सोसायटीने स्वत:च ही कारवाई केली नाही तर मग महानगरपालिकेकडून ही बिल्डींग पाडण्यात येईल आणि त्याचा खर्च आदर्श सोसायटीकडून वसूल करण्यात येईल. पर्यावरण संरक्षण कायद्याच्या सेक्शन 15 नुसार पर्यावरणाच्या कायद्याचं उल्लंघन करणारी इमारत पाडण्याचे आदेश जारी केले जातात. आता राज्य सरकारला याच आदेशाची प्रतीक्षा आहे.

close