लवासा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध नाही -सुप्रिया सुळे

January 17, 2011 12:36 PM0 commentsViews: 54

17 जानेवारी

लवासा प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक आहे. तिथं शाळा येतात, अनेक विकासकामे होत आहेत, असा दावा केला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध नाही त्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश या प्रकल्पाचा सहानूभूतीपुर्वक विचार करतील अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. पर्यावरण समतोल आणि विकासाचा समन्वय साधला जावा आणि यात जर चूका झाल्या असतील तर जयराम रमेश यांनी दंडही करावा असं मतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

लवासामध्ये बांधल्या जात असलेल्या धरणाचा पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही. आपल्या मतदारसंघात वरसगाव धरण असल्यानं मी पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ कसा देईन असा सवालही त्यांनी केला. सुप्रिया सुळे पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या. लवासा अ सो वा जैतापूर स्वयंसेवी संस्थांनी चर्चेकरता पुढं यावं असं ही त्या म्हणाल्यात.

close