शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यासाठी डॉ. कोरडे यांचं आमरण उपोषण

January 17, 2011 1:47 PM0 commentsViews: 1

17 जानेवारी

शिक्षणाचं बाजारीकरण रोखण्यासाठी फी नियंत्रण कायदा करण्यात यावा आणि प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी या मागणीसाठी शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचाचे अध्यक्ष डॉ. विवेक कोरडे यांनी आमरण उपोषण सुरु केलं. शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्वाच्या मागण्या त्यांनी यानिमित्ताने मांडल्या आहेत. यामध्ये प्रमुख मागणी आहे ती म्हणजे इ बी सी ची म्हणजेच आर्थिक दृष्ट्या मागासांसाठीची उत्पन्न मर्यादा पंधरा हजार रुपयांंवरुन एक लाखापर्यंत करण्यात यावी. कारण ही मर्यादा 1993 मध्ये ठरवण्यात आली होती आणि बदललेल्या आर्थिक स्तराशी ती सुसंगत नाही असं कोरडे यांचं मत आहे. त्याचप्रमाणे फीवाढीला आळा घालण्यासाठी फी नियंत्रण कायदा करण्यात यावा. पूर्व प्राथमिक शिक्षणाचे म्हणजे प्री नर्सरीचे प्रवेश हे पारदर्शक किंवा लॉटरी पद्धतीनं करण्यात यावेत अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. त्यांच्या उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे. पण अजूनही शिक्षणमंत्र्यांनी त्याची दखल घेतली नाही. सरकार जोपर्यंत आंदोलनाची दखल घेऊन मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरुच ठेवण्यात येणार असल्याचे डॉ कोरडे यांनी सांगितलं आहे.

close