विठोबाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी उत्सव मूर्तीची स्थापना

January 17, 2011 2:11 PM0 commentsViews: 1

17 जानेवारी

पुरातत्व विभागानं श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेण्यात आली आहे. यापुढच्या काळात भक्तांच्या महापूजांसाठी स्वयंभू मूर्तीवर अभिषेक न करता पर्यायी उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे. त्या अनुशंगानं नाशिकचे मूर्तिकार नंदकिशोर तारे यांनी मंदिर समितीकडे उत्सवमूर्तीची प्रतिकृती सादर केली. पुढच्या महिन्यापासून या उत्सव मूर्तीवर भक्तांना महापूजा करण्याची संधी मिळणार आहे.

close