तुळजापूरमध्ये शाकंभरी महोत्सवाची सांगता

January 17, 2011 2:21 PM0 commentsViews: 1

17 जानेवारी

तुळजापुरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता झाली. या महोत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे तुळजापुरात यंदाही जलयात्रा काढण्यात आली. या जलयात्रेसाठी हजारो सुवासिनी महिला डोक्यावर जलकुंभ घेऊन तुळजापुरात दाखल झाल्या होत्या. या जलकुभांची मिरवणूक काढून नंतर त्या पाण्यानं देवीचा गाभारा स्वच्छ करण्यात आला. आजची पुजा ही अश्विन शुद्ध द्वादशी निमित्त केली जाते. या जलयात्रेद्वारे गेले सात दिवस चालू असणारी शांकभरी नवरात्र महोत्सवाची सांगता झाली.

close