लातूरमध्ये रिक्षा चालकांचा संप

January 17, 2011 2:24 PM0 commentsViews:

17 जानेवारी

लातूर शहरात आज सकाळपासून रिक्षांचा संप सुरु आहे. सतत होणा-या पेट्रोलच्या भाववाढीचा निषेध म्हणून आज लातूर शहरातील रिक्षाचालकांनी संप पुकारला. ज्या रिक्षा प्रवासी वाहतूक करत होत्या त्या रिक्षा चौकाचौकात अडवण्यात आल्या त्यामुळे शहरात बराच काळ तणाव निर्माण झाला होता. या सर्व रिक्षाचालकांनी टाऊन हॉलच्या मैदानावर रिक्षा उभ्या केल्या आहेत. या संघटनांनी रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्याचा ही निर्णय घेतला आहे. या संपात लातूर शहरातील चार हजार रिक्षा सहभागी झाले आहेत.

close