म्हाडाच्या निषेधार्थ गिरणी कामगारांचा मोर्चा

January 17, 2011 2:30 PM0 commentsViews: 8

17 जानेवारी

गिरणी कामगारांसाठी म्हाडाने 10 हजार घरे बांधली आहेत पण अजुनही घराचं वाटप गिरणी कामगारांना झालेलं नाही तसेच घरांची किंमतही अवास्तव लावलेली आहे. याचाच निषेध म्हणून गिरणी कामगारांनी आज मुंबईत भव्य मोर्चा काढला. आझाद मैदानात शेकडो गिरणी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु केलं. जोपर्यंत मुख्यमंत्री गिरणी कामगारांच्या घरांबाबत योग्य निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार गिरणी कामगारांनी व्यक्त केला आहे. आंध्रपद्रेशतील गिरणी कामगारही या आंदोलनात सहभागी झालेले आहेत.

close