शंकरपट बैलगाडी स्पर्धेत बैलाना काट्याचा मार !

January 17, 2011 2:51 PM0 commentsViews: 123

17 जानेवारी

औरंगाबादच्या नक्षत्रवाडी भागात भरविण्यात आलेल्या शंकरपट अर्थात बैलगाड्यांच्या स्पर्धेत बैलांच्या पाठीवर काठ्या चालवून ऍनिमल क्रुअल्टी ऍक्टचे उल्लंघन करण्यात आलं. एकीकडे स्पर्धेसाठी बैलांंना काजू बदाम खाऊ घालायचे आणि दुसरीकडे अक्षरश: खिळे लावलेल्या काठ्यांनी त्यांना धोपटायचे अशी ही शंकरपट स्पर्धा आहे. या स्पर्धेत सहभागी असलेल्यांना आनंद मिळतो पण त्यासाठी बैलांना गंभीर जखमा होतात. विना परवाना भरविलेल्या या स्पर्धेकडे जिल्हा आणि पोलिस प्रशासनही सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतं आहे. औरंगाबादच्या सर्वोदय मंडळातर्फे गेल्या सात वर्षांपासून ही स्पर्धा भरविली जाते.

कुठल्याही स्थितीत शर्यत जिंकायचीच यासाठी बैलांना याच काट्याच्या काठ्यांनी बेदम मार दिला जातो. अत्यंत क्रूरपणे या बैलांना पिटाळण्यात येतं. लाईन क्लिअर आहे असं म्हणताच बैलांचं शेपूट पिरगाळून त्यांच्यावर काठ्या चालविल्या जातात. जिवाच्या आकांतान हे बैल धावतात. ही स्पर्धा अत्यंत जीवघेणी असते एकदा सैरभर झालेले बैल थांबवितानाही त्यांना खूप जोराने वेसण ओढावी लागते. ही स्पर्धा बघण्यासाठी बघ्यांची गर्दी होते. स्पर्धेचं धावतं वर्णनही केलं जातं आणि धक्कादायक म्हणजे त्यासाठी वापरण्यात येणार्‍या विजेचं कनेक्शनही अनधिकृत आहे.

close