सचिन तेंडुलकरला धमकी मिळाल्याची अफवा

November 3, 2008 10:09 AM0 commentsViews: 21

3 नोव्हेंबर , नागपूरसचिन तेंडुलकरला अपहरणाची धमकी मिळाल्याची अफवा नागपुरात पसरलीय. नागपूरचे पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांनी या धमकी विषयीची माहिती दिली. ते म्हणाले, सचिनबाबत नवीन धमकी नाही. तरीही आम्ही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवणार आहोत. प्रत्यक्षात अशी धमकी मिळाली किंवा नाही यासंबंधी कोणतीच माहिती पोलिसांकडे उपलब्ध नाही. परंतु या बातमीमुळे नागपूर पोलीस सतर्क झाले आहेत.

close