जैतापूर प्रकल्पाबाबत जनसुनावणीवर आंदोलकांनी बहिष्कार टाकला

January 17, 2011 4:03 PM0 commentsViews: 3

17 जानेवारी

जैतापूर प्रकल्पावर उद्या मुंबईत होणार्‍या खुल्या चर्चेवर आंदोलकांनी बहिष्कार टाकला आहे. मुख्यमंत्री हे दिल्लीच्या इशार्‍यावरून काम करत असून ते नि:पक्षपातीपणे भूमिका घेणार नाहीत असा आरोप आंदोलकांचे नेते बी.जी.कोळसेपाटील यांनी केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली. सरकार आंदोलकांवर खोटे गुन्हे घालून दडपशाही करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. चर्चा मुंबईत घेण्याएवजी रत्नागिरी किंवा माडबनला का घेत नाहीत असा सवालही त्यांनी केला. याच मुद्द्यावर आज दिवसभरात जैतापूर परिसरातल्या 80 ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. तर 8 सरपंचांनीही राजीनामे दिले. जैतापूरसंबंधीची बैठक माडबनला का होत नाही यावरच आंदोलकांचा आक्षेप आहे.

close