‘लवासा’वर कारवाई होणार ?

January 17, 2011 4:26 PM0 commentsViews: 1

17 जानेवारी

लवासा प्रकल्प संदर्भातला अहवाल पर्यावरण मंत्रालय उद्या मुंबई हायकोर्टात सादर करणार आहे. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार पर्यावरण कायद्याचं उल्लंघन झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली. त्यामुळे लवासाला तुर्तास दिलासा मिळण्याची शक्यता नाही. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून लवासाचं काम झाल्याचा आरोप करण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि डोंगर तोडण्यात आल्याने नागरीक आणि सामाजिक कार्यकर्त्याचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे लवासा प्रकल्प वादात सापडला. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पर्यावरण विभागाच्या तीन सदस्यीय पथकानं लवासाची पाहणी केली होती.

close