संघ आणि अभिनव भारत संघटनेवर बंदी घालावी राष्ट्रवादीची मागणी

January 17, 2011 5:23 PM0 commentsViews: 7

17 जानेवारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अभिनव भारत संघटनेवर बंदी घाला अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांची भेट घेऊन ही मागणी केली. या शिष्टमंडळात तारीक अन्वर आणि जितेंद्र आव्हाड यांचा समावेश होता. असीमानंदांच्या कबुलीजबाबामुळे मालेगाव स्फोटासंदर्भात अटक केलेले लोक हे निर्दोष आहेत हे सिद्ध होत आहे. त्यामुळे मालेगाव प्रकरणातील सध्या अटकेत असलेल्या आरोपींवरील खटले मागे घेण्याची मागणी शिष्टमंडळातील रा़ष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी केली आहे.

close