भारत – दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज आघाडीसाठी लढत

January 18, 2011 9:50 AM0 commentsViews: 1

18 जानेवारी

वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम आता जाहीर झाली आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता पुन्हा आजच्या भारत – दक्षिण आफ्रिका वन डे मॅचकडे वळलं आहे. सीरिज 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे केपटाऊनमधली तिसरी वन डे जिंकून आघाडी घेण्याचा दोन्ही टीमचा प्रयत्न असेल. पण त्यासाठी भारतीय बॅट्समनना आपली कामगिरी सुधारावी लागेल. सलग दोन वन डेमध्ये बॅट्समननी निराशा केली. त्यातच सेहवाग, गंभीर आणि सचिन हे तीन टॉप ऑर्डर बॅट्समन दुखापतीमुळे खेळत नाही. त्यामुळे जबाबदारी कोहली, युवराज आणि युसुफवर असणार आहे. युसुफ, पियुष चावला यांची नावं वर्ल्डकप टीममध्ये आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतल्या उरलेल्या तीन मॅच खेळायची संधी या दोघांना मिळेल अशी शक्यता आहे.

close