पिंपरी चिंचवड परिसरातील क्लोरीन गळती आटोक्यात

January 18, 2011 10:47 AM0 commentsViews: 4

18 जानेवारी

पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरातील भातनगर इथं सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून झालेली क्लोरीन गॅसची गळती आटोक्यात आली. पहाटे चार वाजता क्लोरीनचा एक सिलेंडर लीक झाला. त्यानंतर ही गळती सुरू झाली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना या गळतीचा त्रास सुरु झाला. तिथल्या लोकांना श्वसन, खोकल्याचा त्रास सुरु झाला. एकूण 14 जणांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यातल्या चार जणांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं. तर ही गळती रोखण्यासाठी फायर ब्रिगेडची 5 बंब दाखल झालेत. या गॅस गळतीचा फॉयरब्रिगेडच्या जवानांसह नागरिकांनाही त्रास झाला. गळती आता आटोक्यात आली आहे.

close