औरंगाबादमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना घेराव

January 18, 2011 10:58 AM0 commentsViews: 6

18 जानेवारी

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत न बोलावल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनचे खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा आमदार अभिजीत अडसूळ यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना घेराव घातला. 11 जानेवारीला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या पूर्वतयारीला शिवसेना खासदार, आमदारांना डावलण्यात आलं होतं. त्याचा निषेध म्हणून शिवसेनेनं घेराव घातला. अखेर विखे पाटील यांनी या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. जिल्हाधिकारी रिचा बागला यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अडसूळ केली.

close