व्हिडिओ गेम खेळण्यासाठी शाळकरी मुलांनी चोरल्या 22 सायकली

January 18, 2011 11:04 AM0 commentsViews: 50

18 जानेवारी

विद्यार्थ्यांना एखाद्या खेळाचा छंद किती महागात पडू शकतो याचं उदाहरण नागपूरच्या हुडकेश्वर भागात बघायला मिळालं. नववी आणि दहावीत शिकणार्‍या तीन शाळकरी मुलांना व्हिडिओ गेम खेळण्याचा छंद इतका जडला की त्यांना हा गेम खेळण्यासाठी पैसे कमी पडू लागले. मग त्यांनी चक्क सायकल चोरी करण्याचा सपाटा सुरु केला. एक – दोन नव्हे तर तब्बल 22 सायकली त्या विद्यार्थ्यांनी चोरल्या. सायकल चोरीच्या वारंवार तक्रारी मिळत असल्यानं पोलिसांनी चोरांवर पाळत ठेवली. तपासात तीन शाळकरी मुलं सायकली चोरी करत असल्याचं आढळलं. पोलिसांनी या तीन शाळकरी मुलांना अटक करुन बाल सुधारगृहात पाठवलं.

close