औरंगाबाद महानगरपालिकेत नगरसेवकांनी केली तोडफोड

January 18, 2011 11:56 AM0 commentsViews: 1

18 जानेवारी

औरंगाबाद महानगरपालिकेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घालत तोडफोड केली. विकासकर वसुलीला मुदतवाढ दिल्यानं संतप्त झालेल्या विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक होत सभागृहातले माईक तोडले आणि फॅर्निचरची तोडफोड करण्याचा पर्यंत्न केला. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ही तोडफोड केली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक गिरजाराम हळनोर आणि अपक्ष मुजीम आलमशहा यांच्यात धक्काबूक्कीही झाली.

close