जैतापूर प्रकल्पासंबंधीत बैठकीला प्रकल्पग्रस्तांच्या विरोध कायम

January 18, 2011 12:21 PM0 commentsViews:

18 जानेवारी

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पासंबंधात प्रकल्पग्रस्तांच्या शंका निरसनासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीवर प्रकल्पग्रस्तांनी पूर्णपणे बहीष्कार घातला. या बैठकील एकही प्रकल्पग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्तांचा कोणीही नेता उपस्थित राहणार नाहीत. तर दुसरीकडे सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्याच सरपंचांनी या प्रकल्पाविरोधात राजीनामे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे या प्रकल्पाला असणारा विरोध तीव्र होत चालल्याचं स्पष्ट होतं. सोमवारी 10 ग्रामपंचायतीचे 80 सदस्य आणि 8 सरपंचांनी आपला राजीनामा दिला. या पुढच्या टप्प्यात आता आणखी 7 सरपंच राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. या सगळ्यामुळे एक बिकट घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला असून यासंबंधांत कोकण भवन इथं सरकारी अधिका-यांची तातडीची बैठक झाली.

close