नाशिकमध्ये कमान दुर्घटना प्रकरणी दोन अधिकारी निलंबित

January 18, 2011 1:00 PM0 commentsViews: 4

18 जानेवारी

नाशिक महापालिका कमान दुर्घटना प्रकरणी महापालिकेनं मोहम्मद कौस आणि सुनिल रौंदळ 2 इंजिनिअर्सना निलंबित केलं. ठेकेदारासह महापालिकेच्या या दोन्ही इंजिनिअर्सवर सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विहीतगावमधल्या सौभाग्यनगरमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. बांधकाम सुरू असलेली ही कमान कोसळल्यानं खालून जाणार्‍या रिक्षाचा चक्काचूर झाला. महापालिकेच्या निकृष्ट बांधकामामुळे ही कमान पडल्याची तक्रार पुढे येते. मृतांमध्ये अनिल ननावरे या 7 वर्षांच्या मुलाचा आणि रिक्षा ड्रायव्हर शैलेश पगारेचा समावेश आहे. दगावलेल्या महिलेची ओळख पटू शकलेली नाही. याआधी चार वर्षापूर्वी सातपूरमध्ये स्वागतकमानीची घंटा पडून एक नागरीक ठार झाला होता. तेव्हापासून कमानीच्या निकृष्ट बांधकामासंदर्भात अनेक तक्रारी होत्या.

close