पुण्यात रंगणार पुलोत्सव

November 3, 2008 10:35 AM0 commentsViews: 10

3 नोव्हेंबर, पुणेअद्वैत मेहता 8 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2008 दरम्यान पुण्यात आशय सांस्कृतिक आणि परांजपे स्किम्सतर्फे पुलोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ साहित्यिक विं.दा. करंदीकर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. त्यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचा पु.ल.स्मृती देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या पुलोत्सवात चित्रपट, लघुपट, नाटक संगीत या सगळ्या अभिजात कला पाहण्याची संधी मिळणार आहे. तशी माहिती महोत्सवाचे संयोजक विरेंद्र चित्राव यांनी दिली.

close