‘सोशल नेटवर्क’ या सिनेमाला सर्वाधिक पुरस्कार

January 18, 2011 2:39 PM0 commentsViews: 1

18 जानेवारी

68 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. यात ए.आर.रे़हमानचं नॉमिनेशन होतं पण भारतीयांच्या पदरात निराशाच पडली. यावेळी जास्तीत जास्त पुरस्कार द सोशल नेटवर्क या सिनेमानं पटकावले. या सिनेमाचा दिग्दर्शक डेविड फिन्चरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. कोलिन फर्थला द किंग्ज स्पीच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. नॅतॅली पोर्टमनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला गेला. तिला ब्लॅक स्वानसाठी हा पुरस्कार मिळाला.

close