जळगावमध्ये ट्रक नाल्यात कलंडला 5 जणांचा मृत्यू

January 18, 2011 3:31 PM0 commentsViews:

18 जानेवारी

जळगावच्या मुक्ताईनगर नगर इथं कर्कीच्या आरटीओ चेकपोस्टजवळ झालेल्या भीषण अपघातात 5 जणांना बळी गेला. चेकपोस्टवर पावती फाडायला ड्रायव्हर गेला आणि अचानक न्यूट्रल झालेला हा ट्रक रस्त्यालगत असलेल्या नाल्यात जाऊन कलंडला.गाडीत लोड केलेल्या संगमरवरच्या फरश्यांच्या खाली गाडीतले प्रवासी दबले. कोणतीच मदत मिळण्यासारखी परिस्थिती नसल्यानं क्लीनरसह 5 जणांना आपला जीव गमवावा लागला. चेकपोस्टवर जाताना ड्रायव्हरनं ट्रक गिअरमधे टाकला असता तर हा अनर्थ घडला नसता.

close