विहीरीत पडलेला बिबट्या जंगलात पळला

January 18, 2011 5:12 PM0 commentsViews: 121

18 जानेवारी

अहमदनगर जिल्हातील पारनेर तालुक्यातील संजय नांगरे या शेतकर्‍याच्या शेतातील विहीरीत पहाटेच्या सुमारास बिबट्या पडला. या बिबट्याला बघण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली. या बिबट्याला वाचवण्यासाठी नागरीकांनी बांबूचा सापळाही टाकला होता. पोलिस आणि वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा मागवला. मोठ्या शर्थीनं बिबट्याला बाहेर काढण्यात यश मिळालं. त्यानंतर हा बिबट्या जंगलात पळून गेला.

close