जैतापूर प्रकल्पला विरोध करु नका मुख्यमंत्र्यांचं आवाहन

January 18, 2011 5:45 PM0 commentsViews: 2

18 जानेवारी

जैतापूर प्रकल्प देशहिताचा आहे त्याला विरोध करु नका, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.या संदर्भात प्रकल्पग्रस्तांच्या शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये खुली चर्चा घेतली. या प्रकल्पामुळे मच्छिमारीवर परिणाम होणार नाही. जैवविविधतेला धोका पोहोचणार नाही असा दावा मुख्यमंत्री आणि तज्ज्ञांनीही केला. प्रकल्पग्रस्तांना भरीव मोबदला दिला जाईल तसेच 938 हेक्टरपेक्षा जास्त जमीन संपादित केली जाणार नाही. प्रकल्प ग्रस्तांना विस्थापित केलं जाणार नाही. अशा अनेक प्रश्नांची ठोस आश्वासनं या चर्चेच्या वेळी राज्यकर्ते आणि तज्ञांनी उपस्थितांना दिली. यामुळे सुमारे 10 हजार मेगावॅटच्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविषयीचे गैरसमज दूर होेण्यास मदत झाली. पण त्याचवेळी कोकण किनारपट्टीवर उभारल्या जाणार्‍या 35 हजार मेगावॅटच्या औष्णिक प्रकल्पाची गरज काय असा सवालही करण्यात आला. त्यावर मात्र समाधानकारक उत्तर मिळालं नाही.

close