सचिन क्रिकेटमधला सर्वोत्तम बॅट्समन -लारा

January 18, 2011 6:11 PM0 commentsViews: 3

18 जानेवारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आजच्या काळातला ब्रॅडमन आहे अशी प्रशंसा वेस्टइंडिजचा महान बॅट्समन ब्रायन लारानं केली. क्रिकेट जगतातला तो सर्वोत्तम बॅट्समन आहे आणि सचिनबरोबर आपलं नाव घेतलं जातं ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची असल्याचंही लारानं म्हटलं आहे. गेली 20 वर्ष सचिन खेळतोय आणि आजही त्याची खेळातली एकाग्रता तिच आहे असं कौतुकही त्यानं केलं. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट क्लिनिकमध्ये ब्रायन लारानं हजेरी लावली होती. यावेळी त्यानं ही प्रतिक्रिया दिली. आयपीएल लिलावात आपल्यावर बोली लागली नाही यावरही लारानं पहिल्यांदाच आपलं मत व्यक्त केलं.

close