महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी बुडवला कोटींचा आयकर

January 19, 2011 9:02 AM0 commentsViews: 33

19 जानेवारी

महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी अडीच हजार कोटींचा आयकर बुडवल्याचा ठपका आयकर विभागानं ठेवला आहे. या आयकराच्या वसुलीसाठी आयकर विभागानं राज्यातील साखर कारखान्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखाना (प्रवरानगर), मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, स्वामी समर्थ साखर कारखाना (जालना), ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना (नेवासा) यांच्यासह एकूण सहा सहकारी साखर कारखान्यांना नोटीसा आल्या आहेत. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांचे धाबेच दणाणले आहेत. या नोटीसांना स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज संध्याकाळी केंद्रीय अर्थमंत्री मंत्री प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत.

close