भारताचा दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय

January 19, 2011 9:24 AM0 commentsViews: 3

19 जानेवारी

केपटाऊन वन-डेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेवर दोन विकेट राखून मात करत भारतानं या सीरिजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली. युसुफ पठाण, हरभजन आणि जहीरने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाला हे यश मिळवता आलं. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतीय बॉलर्सनं अचूक टप्पा टाकत आफ्रिकेला मोठा स्कोअर उभा करू दिला नाही. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 221 रन्सचं आव्हान ठेवलंं. पण भारताची सुरूवात मात्र चांगली झाली नाही. टीम इंडियाचे पहिले पाच बॅट्समन 100 रन्सच्या आतच पॅव्हेलियमध्ये परतले. पण पठाण आणि हरभजन सिंगनं भारताचा विजय खेचून आणला. पाच वन-डे मॅचच्या सीरिजमध्ये भारताने 2-1 अशी आघाडी घेतली..

close