पर्यावरण कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी बिल्डर हिरानंदानींना नोटीस

January 19, 2011 9:29 AM0 commentsViews: 4

19 जानेवारी

पुणे जिल्ह्यातल्या नवलाकुंबरे इथं हिरानंदानी ग्रुपकडून गॅस विद्युत प्रकल्प उभारला जातो. पण तिथं त्यांनी हा प्रकल्प उभारताना पर्यावरणांचं उल्लंघन केल्याचं ठपका ठेवत वडगाव-मावळ कोर्टानं निरंजन हिरानंदानी यांना समन्स बजावलं आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचाही जोरदार विरोध आहे. पर्यावरण संरक्षण कायद्याच्या सेक्शन 15, 16 आणि 17 नुसार कोर्टानं हे समन्स बजावलं आहे. पाण्याचंही प्रदुषण झाल्याचा ठपका कोर्टानं ठेवला आहे. 22 जानेवारीच्या आत याला उत्तर देण्याचे आदेशही कोर्टानं हिरानंदानी यांना दिले आहे.

close