औरंगाबादमध्ये मुलीचं अपहरण करुन बलात्कार करणार्‍या तिघांना अटक

January 19, 2011 10:20 AM0 commentsViews: 9

19 जानेवारी

औरंगाबाद शहरातल्या वाळूज परिसरात भररस्त्यात उभ्या असलेल्या मुलीचं मोटारसायकलवरून अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपीपैकी संदीप प्रधान याच्याविरूध्द यापूर्वीही एका महिलेचा घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. आजूबाजूला गर्दी असतानाही मुलीच अपहरण करून बलात्कार झाल्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. संदीप प्रधान, आतिष काळे आणि महेश निकम हे ते तिघे आरोपी आहेत.

बजाजनगर या गजबजलेल्या भागातून या तिघांनी सोमवारी सायंकाळी एका मुलीच मोटारसायकलवरून अपहरण केलं. त्यावेळी आजूबाजूला गर्दी होती. या मुलीनं आरडाओरड करूनही कुणीही तिच्या मदतीसाठी धावलं नाही. संदीप प्रधान आणि त्याच्या मित्रांनी या मुलीला वाळूज महानगरलगतच असलेल्या एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी मुलीच्या आई वडिलांनी मंगळवारी सकाळीच पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना मध्यरात्री अटक केली आहे. भररस्त्यावरून जाणार्‍या मुलीचं मोटारसायकलवरून अपहरण आणि नंतर बलात्काराची घटना घडल्यामुळं नागिरकांत एकच खळबळ उडाली.

close