शिकार केल्याच्या आरोपावरुन संशयिताला अमानुष मारहाण

January 19, 2011 10:24 AM0 commentsViews: 1

19 जानेवारी

गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगाव वनक्षेत्रात 20 दिवसांपूर्वी एका रानगव्याची शिकार झाली होती. या प्रकरणी गोरगाव वन खात्याच्या कर्मचार्‍यांनी जवळच्या गावातल्या पोतनलाल पटले याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या चौकशीदरम्यान वन खात्याच्या कर्मचार्‍यांनी पटले यांना विवस्त्र करुन त्याचा विकृत छळ केल्याचं उघड झालं. लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे पटले यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर के टी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या संदर्भात पोतनलाल यांनी गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. दोषी कर्मचार्‍यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी भाजपने केली आहे.

close