नवी मुंबईच्या बाजारात भाज्यांचे दर उतरले

January 19, 2011 10:34 AM0 commentsViews: 10

19 जानेवारी

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक प्रचंड वाढली. आवक वाढल्याने भाज्यांचे दर उतरले आहेत. त्यामुळे किरकोळ मार्केटमध्येही भाज्यांचे दर उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान होलसेल बाजारात भाज्यांचे भाव कमी झाले तरी किरकोळ बाजारात मात्र भाज्यांच्या भावात फरक पडलेला नाही. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव जैसे थेच आहे.

भाज्यांचे एपीएमसी मधले दर प्रति किलो

फ्लॉवर – 2 ते 4 रुपयेकोबी- 4 ते 6 रुपयेघोसाळे- 4 ते 6 रुपयेदुधी 5 – 6 रुपयेगाजर 6 ते 8 रुपयेवांगी-10 ते 12 रुपये मटार-14-16 रुपयेघेवडा-12 रुपयेसिमला मिर्ची-14-15 रुपयेटोमॅटो 32 ते 34 रुपयेफरसबी 20 ते 22 रुपयेभेंडी 25 – 30 रुपयेमेथी – 2 ते 6 रुपयेकोथिंबीर- 2 ते 5 रुपये

close