वर्ल्डकपच्या काऊंटडाऊनला सुरुवात

January 19, 2011 10:42 AM0 commentsViews: 1

19 जानेवारी

वर्ल्ड कपला आता बरोबर एक महिना उरला.आणि आयसीसीने याचं काऊंटडाऊन सुरू केलं आहे. मुंबईत स्टॉक एक्सचेंजची बेल वाजवून हे काऊंटडाऊन सुरू करण्यात आलं. यानिमित्ताने स्टॉक एक्सचेंजी बेल वाजवण्याचा मान आयसीसी अध्यक्ष शरद पवार आणि आयसीसीचे सीईओ हरून लोगार्ड यांना देण्यात आला. या कार्यक्रमात बीसीसीआयचे सीएओ रत्नाकर शेट्टीही उपस्थित होते. यावेळी वर्ल्ड कपची ट्रॉफीही बीसीसीआयकडे देण्यात आली. आणि आता वर्ल्ड कप स्पर्धा होईपर्यंत ही ट्रॉफी भारतात ठेवली जाणार आहे. स्पर्धेची फायनल मुंबईत होणार आहे. आणि वानखेडे स्टेडियमचं काम पूर्ण झाल्याचंही यावेळी शरद पवार यांनी सांगितलं.

close