शबाना आझमी दिसणार वॉटरफिल्टरच्या जाहिरातीत

January 19, 2011 11:10 AM0 commentsViews: 65

19 जानेवारी

'पियो हेल्दी, जियो हेल्दी' असं म्हणतं नसाका वॉटर प्युरिफायर या कंपनीच्या जाहिरातीत आता चक्क अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी झळकणार आहेत. ओकाया ग्रुपनं या वॉटर प्युरीफायरचं लाँचिंग केलं आहेत. शंभर टक्के शुद्ध पाण्याचा दावाही या जाहिरातीत करण्यात आला. मिर्झा वेल्फेअर सोसायटीद्वारे शबाना आझमी सध्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. याचाच एक भाग म्हणून शबाना या जाहिरातीत दिसणार आहेत. 'प्यासे को पानी' या अभियानांतर्गत या जाहिरातीची निर्मिती करण्यात आली.

close