पटेल यांच्याकडे अवजड खातं तर विलासरावांकडे ग्रामविकास खातं

January 19, 2011 11:24 AM0 commentsViews: 11

19 जानेवारी

अखेर यूपीए-2 चा पहिला फेरबदल आज पार पडला. अपेक्षेनुसार कुणाचाही मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली नाही तर फक्त खांदेपालट झालं. यामध्ये सर्वात महत्वाचा बदल आहे तो म्हणजे शरद पवार यांच्याकडून नागरी पुरवठ्याची जबाबदारी काढण्यात आली त्यांच्याकडे कृषीखात्यासोबतचं अन्न प्रक्रियाची जबाबदारी देण्यात आली. विलासराव देशमुख यांच्याकडून अवजड उद्योग खातं काढून घेण्यात आलं. त्यांच्याकडे ग्रामविकासची जबाबदारी देण्यात आली. प्रफुल्ल पटेल यांना अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.गुरुदास कामत यांना गृहराज्य मंत्रालय देण्यात आलं.

महाराष्ट्रासाठी महत्वाचं म्हणजे विलासराव देशमुखांना महत्वाचं समजलं जाणारं ग्रामविकास खातं देण्यात आलं. तर प्रफुल्ल पटेल यांना विलासरावांच अवजड उद्योग खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. अत्यंत महत्वाचं असलेले पेट्रोलियम खातं मुरली देवरांकडूनं काढून जयपाल रेड्डींना देण्यात आलं. तर देवरांना कंपनी व्यवहार खात्याची जबाबदारी देण्यात आली. तर गुरूदास कामत यांच्याकडे गृहराज्यमंत्रीपद देण्यात आलं. तर प्रतिक पाटील यांच्याकडे महत्वाचं कोळसा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळात खांदेपालट

शरद पवार

- पूर्वी – कृषी आणि अन्न-नागरी पुरवठा – आता – कृषी आणि अन्नप्रक्रिया

प्रफुल्ल पटेल – पूर्वी – नागरी हवाई वाहतूक (राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार)- आता – अवजड आणि सार्वजनिक उद्योग (कॅबिनेट दर्जा)

विलासराव देशमुख – पूर्वी – अवजड उद्योग – आता – ग्रामविकास, पंचायत राज (अतिरिक्त कार्यभार)

मुरली देवरा – पूर्वी – पेट्रोलियम – आता – कंपनी अफेअर्स

गुरुदास कामत – पूर्वी – माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री- आता – गृहराज्यमंत्री

प्रतीक पाटील – पूर्वी – क्रीडा राज्यमंत्री – आता – कोळसा राज्यमंत्री

कॅबिनेट मंत्री

सलमान खुर्शीद – कॅबिनेट मंत्रिपदी बढती – पूर्वी – अल्पसंख्याक कल्याण, कॉर्पोरेट अफेअर्स (राज्यमंत्री)- आता – जलस्रोत मंत्री (कॅबिनेट)

श्रीप्रकाश जयस्वाल कॅबिनेट मंत्रिपदी बढती – पूर्वी – कोळसा (राज्यमंत्री) – आता – कोळसा (कॅबिनेट)

वीरभद्र सिंग – पूर्वी – पोलाद – आता – सूक्ष्म, लहान, मध्यम उद्योग

एस. जयपाल रेड्डी पूर्वी – नगरविकास आता – पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस

कमलनाथ – पूर्वी – रस्ते वाहतूक – आता – नगरविकास

एम. एस. गिल – पूर्वी – क्रीडा मंत्रालय – आता – स्टॅटिस्टीक्स आणि उपक्रम अंमलबजावणी

कपील सिब्बल – पूर्वी – मनुष्यबळ विकास, दूरसंचार – आता – मनुष्यबळ विकास, दूरसंचार

सी. पी. जोशी – पूर्वी – ग्रामविकास – आता – रस्ते वाहतूक आणि हायवे

वायलर रवी – पूर्वी – अनिवासी भारतीय- आता – अनिवासी भारतीय, नागरी हवाई वाहतूक (अतिरिक्त कार्यभार)

पवनकुमार बन्सल – पूर्वी – संसदीय कामकाज – आता – संसदीय कामकाज, विज्ञान-तंत्रज्ञान (अतिरिक्त कार्यभार)

राज्यमंत्री

अजय माकन – गृह – क्रीडा आणि युवक कल्याण

जितीन प्रसाद – पूर्वी – पेट्रोलियम – आता – रस्ते वाहतूक आणि हायवे

ई. अहमद – पूर्वी – अल्पसंख्याक कल्याण – आता – परराष्ट्र

के. व्ही. थॉमस – कृषी, ग्राहक संरक्षण- अन्न-नागरी पुरवठा (राज्यमंत्री)

नवे चेहरे

बेनीप्रसाद वर्मा – पोलाद (राज्यमंत्री)

अश्वनीकुमार – नियोजन, संसदीय कामकाज (राज्यमंत्री)

के. सी. वेणुगोपाल – ऊर्जा

दरम्यान हे बदल किरकोळ आहेत. बजेट अधिवेशनानंतर मंत्रिमंडळात आणखी मोठे फेरबदल होतील असे संकेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिले आहेत. भाजपनं मंत्रिमंडळाच्या फेरबदलावर टीका केली याची देशाला काहीही फायदा होणार नाही असं भाजपनं म्हटलं आहे.

मंत्रिमंडळाच्या फेरबदलाचं आयबीएन-नेटवर्कचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांनी विश्लेषण केलं. 'पंतप्रधानांची नवी टीम ही अर्धीमुर्धी उपाययोजना आहे. यात कोणताही नाट्यपूर्ण निर्णय नाही. कार्यक्षम नसणार्‍या काही मंत्र्यांविरुद्ध पंतप्रधानांनी थोडीफार कारवाई केली असली तरी मंत्रिमंडळातले चार बडे मंत्री मात्र आपल्या स्थानावर कायम आहेत. पंतप्रधानांनी आणखी एक संधी गमावण्याची संधी सोडलेली नाही हेच यातून दिसतं. अनेक घोटाळ्यांनी मलिन झालेली सरकारची प्रतिमा सुधारण्याचा पंतप्रधान प्रयत्न करतील असं सांगितलं जात होतं. या फेरबदलाला तरुण चेहरा असेल अकार्यक्षम मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल अशीही चर्चा होती. पण फेरबदलात असं काहीही घडलं नाही. एकाही मंत्र्याला वगळण्यात आलं नाही. गंभीर आरोप असलेल्यांवरही कारवाई झाली नाही. याला पारदर्शकता म्हणायचं काय? उलट काही अकार्यक्षम मंत्र्यांना अधिक मोठी खाती देण्यात आली आहेत. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी या दोघांनीही या फेरबदलात कोणताही धोका पत्करण्याचं नाकारलं. त्यामुळे पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्या राजकीय व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं.' – राजदीप सरदेसाई

close