औरंगाबादमध्ये माकडांचा धुमाकूळ

January 19, 2011 1:03 PM0 commentsViews: 4

19 जानेवारी

औरंगाबाद जवळच्या मांडकी गावात सध्या माकडाच्या दहशतीनं गावकरी भयभीत झालेले आहेत. माकडाच्या चाव्यामुळे चार जण जखमी झाले आहेत. याच गावात चौदा महिन्यांपूर्वी माकड चावल्यामुळे कलाबाई जाधव या वृध्द महिलेचा मृत्यू झाला होता. आक्टोबर महिण्यात त्यांंचा मृत्यू झाला. माकडानं कडाडून चावा घेतल्यानं त्या जखमी झाल्या होत्या. आधी घरगुती उपचार केल्यानतर त्यांना सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळेच सध्या मांडकी गावातील नागरिक भयभीत झाले आहेत.

तर नागपूरच्या भरतनगर भागामध्ये गेल्या काही महिन्यापासून माकडांच्या टोळीनं धुमाकूळ घातला आहे. या परिसरात 100च्यावर लालतोंडाची माकडं लोकांच्या घरात शिरुन धुमाकुळ घालतात. माकडांनी अनेक लोकांना जख्मी केलं आहे.महापलिकेनही माकड पकडण्यासाठी एक पथक तयार केलं आहे तरीही माकडांची टोळी यांच्या हाती लागली नाही.लाठ्‌या काढ्या घेउन लोक माकडांपासून आपला बचाव करत आहे.

close