पुण्यात बेकायदेशीर बांधकाम दंडात वाढ

January 19, 2011 1:26 PM0 commentsViews: 4

19 जानेवारी

पुण्यात बेकायदेशीररित्या बांधकामे झाल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मात्र आता पुणे महापालिका हद्दीत येणारी अशी बांधकामे नियमित करता येणार आहेत. अशा प्रकारचा प्रस्ताव खुद्द आयुक्तांनी मांडला आणि स्थायी समितीमध्ये त्याला एकमुखाने मंजुरी देण्यात आली. बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिका तडजोड शुल्क आकारणार आहे. हा नियम आधीही लागू होता. मात्र आता या तडजोड शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याच बरोबर बेकायदेशीररित्या बांधकाम करणार्‍यांच्या दंडातही वाढ करण्यात आली. महापालिकेच्या या निर्णयामुळे महापालिकेच्या उत्पनात 80 ते 100 कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातं आहेत.

close