जेजुरीत गाढव बाजाराला सुरुवात

January 19, 2011 3:58 PM0 commentsViews: 4

19 जानेवारी

दरवर्षीप्रमाणे पौष महिन्यातील पौर्णिमेला जेजुरीला गाढवांचा बाजार भरतो. यंदाही राज्याच्या कानाकोपर्‍यातून वैदू, कैकाडी, मांग, पाथरवट अशी अठरापगड जातीचे लोक गाढवांच्या खरेदी-विक्री करता जमले होते. 4 हजारापासून 20 हजारापर्यंतच्या दरानं गाढवं विकली गेली. यंदाही गुजरातच्या काठेवाडी गाढवांना मोठी मागणी होती. एरवी कस्पटासमान लेखल्या जाणार्‍या गाढवांना या बाजारात चांगली किंमत मिळते. गाढव विकत घेतल्यावर काहीजण वाजतगाजत हलगी ताशाच्या गाजावाज्यात गाढवांची मिरवणूक काढतात. इथं काळ्या पांढर्‍या लहान गाढवांपासून ते उंच्यापुर्‍या दणकट काठेवाडी गाढवांपर्यंत शेकडो गाढवांची जत्रा भरते.

close