स्वाभिमान संघटनेवर गदा आल्याची शक्यता

January 19, 2011 4:43 PM0 commentsViews: 3

19 जानेवारी

युवक काँग्रेसमध्ये समांतर संघटना चालवणार्‍या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्थान दिलं जाणार नाही असं सांगून स्वाभिमान संघटनेचं कामकाज खपवून घेतलं जाणार नाही असं राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रभारी जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केलं. तर स्वाभिमान संघटनेचं काम जर युवक काँग्रेसच्या मुळावर येत असेल तर स्वाभिमान संघटनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांना युवक काँग्रेसमध्ये स्थान दिलं जाणार नाही असं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीसुद्धा स्पष्ट केलं. यावरुन स्वाभिमान संघटनेचं कामकाज बंद करण्याचे निर्देश काँग्रेसकडून नितेश राणेंना दिले जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

close