स्वीस बँकेवरुन सरकार गप्प का ? कोर्टाचा सवाल

January 19, 2011 5:33 PM0 commentsViews: 5

19 जानेवारी

स्वीस बँकेतल्या भारतीयांच्या खात्यांवरून भाजप आणि सरकारमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय स्वीस बँकेत खाती असणार्‍या भारतीयांची नावं सरकार जाणूनबुजून जाहीर करत नाही असा आरोप भाजपनं केला होता. त्याला पंतप्रधानांनी हे उत्तर दिलं. हा पैसा भारतात आणण्यासाठी तातडीचा कोणताच उपाय नाही असं पंतप्रधानांनी म्हटलं. दरम्यान सुप्रीम कोर्टानंही सरकारला फटकारलं आहे. काळा पैसा हा देशाच्या तिजोरीवरचा दरोडा आहे हा खूप मोठा गुन्हा आहे अशा कडक शब्दांत कोर्टानं सरकारवर ताशेरे ओढले. या मुद्द्यावर सरकार गप्प का असा सवालही कोर्टानं विचारला.

close