कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी जयचंद्रन यांनाही जामीन

January 19, 2011 5:38 PM0 commentsViews: 2

19 जानेवारी

कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी सीबीआयला आणखी एक धक्का बसला आहे. आयोजन समितीचे अधिकारी टी. एस.दरबारी आणि महिंद्रू यांच्यानंतर आता जयचंद्रन यांनाही कोर्टानं जामीन मंजूर केला. सीबीआयनं जयचंद्रन यांच्याविरोधातही मुदतीत चार्जशीट दाखल केलं नाही. नोव्हेंबरमध्ये त्यांना अटक झाली होती. पण 60 दिवसांनंतरही सीबीआयनं चार्जशीट दाखल केलं नसल्यानं कोर्टानं त्यांना जामीन दिला.

close