कंपनी बदला नंबर तोच ठेवा !

January 19, 2011 5:51 PM0 commentsViews: 2

19 जानेवारी

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी अर्थात एमएनपीला आजबुधवारपासून सुरुवात झाली. मोबाईल तंत्रज्ञानातली ही सगळ्यात महत्त्वाची घडामोड आहे. यामुळे तुमचा नंबर तोच ठेवून कंपनी बदलण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. 70 कोटी भारतीय मोबाईलचा वापर करतात. नवीन कनेक्शन मिळाल्यासारखीच ही प्रक्रिया असेल.आजपासून ही प्रक्रिया सुरु होत असली तरी मागच्या वर्षी 25 नोव्हेंबरला हरियाणात ही सुविधा सुरु झाली आहे. एमएनपीद्वारे तुम्हाला कंपनी बदलायची असेल तर तुमच्या मोबाईलवरुन 1900 वर एसएमएस करा. त्यावर सध्या तुम्ही वापरत असलेली कंपनी युनिक पोर्टिंग कोड पाठवेल.

एमएनपीद्वारे तुम्हाला कंपनी बदलायची असेल तर तुमच्या मोबाईलवरुन 1900वर एसएमएस करा. त्यावर सध्या तुम्ही वापरत असलेली कंपनी युनिक पोर्टिंग कोड पाठवेल. या कोडचा वापर कंपनी बदलण्यासाठीच्या फॉर्मवर कोडचा वापर करा. 48 तासांच्या आत कंपनीकडून तुम्हाला मोबाईल सर्व्हिस मिळेल.सिमकार्डसाठी तुम्हाला खर्च येईल फक्त 19 रुपये. नंबर पोर्ट करतानाच तुम्हाला सीम कार्डही बदलावे लागेल. नवीन कनेक्शन मिळाल्यासारखीच ही प्रक्रिया असेल. आजपासून ही प्रक्रिया सुरु होत असली तरी मागच्या वर्षी 25 नोव्हेंबरला हरियाणात ही सुविधा सुरु झाली आहे.

close