सायना नेहवालने पटकावली वर्ल्ड ज्युनिअर बॅडमिंटनशीप

November 3, 2008 12:20 PM0 commentsViews: 4

03 नोव्हेंबर पुणे,जेमिमा रोहेकरपुण्यात झालेल्या वर्ल्ड ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं इतिहास घडवला. अंतिम फेरीत सायनानं जपानच्या सायाका सातोवर 21 – 9, 21 – 18 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरलीय. पुण्यातल्या बालेवाडीमधल्या श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत बॅडमिंटन फॅन्सनी एकच गर्दी केली होती. कारणही तसंच होतं वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेची फायनल आणि त्यात सामील होती भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल. तिचं स्वागतही त्यांनी त्याच जल्लोषात केलं. सायनानेही त्यांचा हा विश्वास वाया जाऊ दिला नाही. जपानच्या सायाका सातोवर तिने दोन गेममध्ये 21 – 9, 21 – 18 अशी सहज मात केली. सायनाला या विजयासाठी फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत. पूर्ण मॅचमध्ये तिने आघाडी गमावली नाही. या क्रीडानगरीत सिंगल्समधला सायनाचा हा सलग सोळावा विजय. आता यानंतर तिचं लक्ष्य आहे ते चायना ओपन आणि हाँगकाँग सुपर सिरिज जिंकण्याचं.

close