कोल्हापूर महापालिकेत नगरसेवकांनी काढली प्रतिकात्मक यात्रा

January 20, 2011 9:49 AM0 commentsViews: 2

19 जानेवारी

पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनाविरोधात कोल्हापूर- महापालिकेत भाजपचे नगरसेवक आर डी पाटील यांनी प्रतिकात्मक प्रेतयात्रा सर्वसाधारण सभेत आणली. सर्वसाधारण सभा सुरु असतांना ही प्रेत यात्रा काढली गेली. गेल्या वर्षापासुन कोल्हापूरातल्या नागरीकांना अपुरा आणि अस्वच्छ पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे कोल्हापूरातील नागरीक संतापले आहेत. वारंवार महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार करुनही प्रशासनानं याक डं लक्ष दिलं नाही. त्यामुळे आज भाजपाचे नगरसेवक आर.डी. पाटील यांनी पाणी पुरवठा विभागात प्रतिकात्मक प्रेत यात्रा आणली आणि प्रशासनाचा निषेध नोंदवला. प्रशासनाने शहरातील नागरीकांना तात्काळ स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली.

close