मुख्यमंत्र्यांचा विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार

January 20, 2011 9:56 AM0 commentsViews: 1

20 जानेवारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्यासाठी माणचे अपक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी आपली जागा सोडण्याचंी तयारी दाखवली अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्याच गोटातून पुढे आली आहे. या वृत्ताला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीसुद्धा दुजोरा दिला. विधिमंडळात लोकांनीच आपल्याला निवडून पाठवावे अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याची माहितीही माणिकराव ठाकरे यांनी दिली. पण मुख्यमंंत्र्यांसाठी इतर आमदारांनी आपली जागा सोडण्याची तयारी दाखवल्याची माहितीही माणिकाराव ठाकरे यांनी दिली.

close